म्हणतात “ पुणे हे शिक्षणाचे माहेर घर ”
हो पण कसले शिक्षण..?
धर्मशास्त्राचे कि बुजव्या इतिहासाकारकांचे कि फसव्या राज्यशास्त्रा चे धडे देणाऱ्यांचे कि खिंडार पडलेल्या वाड्यांचा इतिहास सांगणाऱ्या वास्तूशिल्पाचे.
खरे तर शिक्षणाचे माहेर घर हे फातिमा व सावित्री यांच्या कार्यातुन तर फुलेंच्यावाड्यातुन उभा झाला.
ना कि शनिवारवाड्यातुन!
शिक्षणाच्या माहेर घराची सुरुवात पोरींच्या मुक्त शिक्षणातून झाली.
तेव्हा केसरी छटा बाजूला सारुन फुले दाम्पंतानी पहिल्या शाळेच्या रुपाने राज्याला व पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हणून नाव दिले.
आज त्यांच माहेर घरात आपल्याच नागरीकांनवर दगडफेक करण्यात आली ज्या सांस्कृतिक व शालिनता शिकविणाऱ्या घरात महिलांवर व पोरींवर हात उगारण्यात आले.
ही कसली संस्कृती म्हणाव..?
खोट्या इतिहासाच्या आधारे माथेफिरु निर्माण करणारे नराधाम स्वंताहाला शिवशाहीर ते शिवप्रतिष्ठानेचे आर्द गुरु म्हणवितात.
हा कसला आधार.?
त्या पराक्रमी शिवाजी राजाच्या राज्यभिषेकाला नाकारणारे आज शिवछत्रपतीचा इतिहास सांगत सुटले.
ज्यांनी शरीराला अग्नी दिला अथवा हातही लावाला त्यांचे कुटूंब संपविण्याचा व वाडीत टाकण्याचा आदेश काढणारे महारवाड्यात संभाजी_राजाच्या समाधीला निर्माण करणाऱ्याच्या अस्तित्वाला नाकारतात तो इतिहास सांगणारे गुरुजी बनून बसतात ते का...?
“ खोट्या इतिहासाने क्रांन्ती घडत नसते ना शिक्षणाची पहिली पायरी.!
तरी नव्या संकल्पनेला आधार देते आधुनिक राष्ट्र व राज्य घडविण्याचा मानस महाराष्ट्रात अनेक संतानी व राष्ट्रपुरुषांनी इतिहासाच्या निर्मितीतुन केला.
जे बुजवे स्वंताहाच्या नावाला राजे संबोधतात.
जे बुजवे स्वंताहाचा इतिहास बहूजनाच्या-राष्ट्रपुरुषाच्या नावाने पोवाडा गाऊन उभा करतात.!
ज्यांच्या नावातच बहूजनाचा ठपका पडला दिसतो व सोंगाड घेत गारुडी रुपाने स्वंताहाला राष्ट्रसंत पदाच्या लोभापोटी प्रवचनाचा मार्ग घेत माथेफिरु उभे करतात.
ते ह्या राज्याच्या विकासाला बांधक ठरतात.!
तेव्हा बहूजनासहीत त्या अस्पृश्य गणल्या गेल्यानी इतिहासाची पुर्णरावृत्ती टाळावी.
भिमाकोरेगाव निश्चित त्या प्रेरणेतेत भर टाकेल.
शनिवारवाडा त्या काळ्या इतिहासाचे प्रतिक बनले गेले जेथून एक समाजाला अस्पृश्य म्हणून घोषित करण्यात आले.
इतिहास हा खरा व आदर्श लोकांच्या हाताने घडायचा असला तर नक्की घडतो.
इतिहास हा पुरंदरे-भिडे-एकबोटे यांच्या सारख्या फाजिल व बुजव्यांच्या साहायाने तर मुळीच घडत नसतो आणी म्हणूनच ३१ डिसेंबर व १ जानेवारी १८१८ च्या शौर्याने इतिहासाची साक्ष पुण्याच्या भीमानदीच्या तिरावर नोंदवून ठेवली!
त्यांच शौर्याने शिक्षणाचे दारे बंद करण्याचा इतिहास त्या राज्यसिंहासनातून खेचून काढला व जुन्या जुलमी राजवटाचा अंत केला.
ज्यांचा अंत झाला त्यांची किव यांवी अशी मनधरणी संकल्पना मनुच्या वारसांनी आता परत ह्या पुरोगामी महाराष्ट्रात रुजविण्याची परंपरा उकरुन काढली परंन्तू शिक्षणाचे जे काही हत्यार आज अस्पृश्यांच्या हातात आले आहे. निश्चितच ह्या कथित धर्मभांडवलदारांच्या व मनुच्या वारसा चालवू पाहणाऱ्यांच्या भीमा नदीच्या काठी परत एकदा दारुन पराभवाने अंत होईल तेव्हा आधूनिक_शिक्षण व राज्यघटना यावरचे हल्ले व सामान्य लोकांवरच्या अत्याचारातून खऱ्या अर्थाने भारत मुक्त होईल!
जय_भीम..
भीमाकोरेगाव..!
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें