रविवार, 6 जनवरी 2019

फासीवादाच द्वि-सुत्री धोरण

फाशीवादाची मुळ रचना ही द्वि-सुत्री विचारधारा जरी असली तरी जगभरातील धर्मांधवादी त्यांचा आधार घेत त्या-त्या देश्यात आपल्याचं लोकांवर अधिराज्य करण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करतात. जणू वर्ग व वर्णाच्या संघर्षात धर्मांधांचा हा मुक्त जाहीरनामाचं होय!  फाशीवाद ही अराजकिय विचारधारा कधी नव्हतीच!  तर ती राजकिय म्हणून एका फॉसिस्ट पक्षाची राजकिय गुरुकिल्ली होती ज्याचा सर्वोसर्वा मुसोलिनी ठरला.
लिबिया वर इटलिच राज्य राहाव व अरबांनी गुलामीचं ओझ डोवारावं म्हणून कटिबंध्य असलेला फासीवादाचा जनक मुसोलिनी नेता ठरला. पुढे हिटलरी वृत्तीने नाझीवाद तयार करुन सामुहिक हत्या घडविल्या. आज भारतांच्या स्वातंत्र लढ्यात माफिनामे सादर करुन आपल्या अलग राष्ट्राची मांग करणारे काही देशभक्त संघ व हिंदूत्व विचारांची बिज नागपूरच्या बळकस चौकाच्या इमारतीतून देशभर पेरण्याचं काम करीत आहे. ति जी अराजकिय संस्था देशभरातील सर्व संस्था काबिज करीत एक राजकिय नेतृत्व पुढे करुन देश्यातील सत्तेच्या माध्यमांन नाझीवादाच्या कार्यपध्दतीने फॉसिस्ट सरकार चे धोरण राबविण्याची प्रयत्न करीत आहे.
आम्ही भारताच्या प्रत्येक घटकातून येणारे लोक जर देश्यातील ह्या द्वि-सुत्री विचारांचा विरोध करणार नाही तर येणारी भावी पिढीचं काय जगभरातील लोक एक विद्रुप अमानविय व धर्मांध लोकांची शिकार झाल्याशिवाय राहणार नाही.!

“ मी माझ्या सध्यास्थित संघर्षातून हा निर्धार करुन पुढे ह्या द्वि-सुत्री विचारांचा विरोध शेवटच्या टोकापर्यन्त करेन येवढंच.!

_रोहित भगत
#सम्यक_विद्यार्थी_आंदोलन_नागपूर

शनिवार, 5 जनवरी 2019

अभिव्यक्ती कि आजादी..?

अभिव्यक्ती कि आजादी..?

शोषल मिडिया हे प्रचार व नव-संपर्क माध्यम ह्यांच प्रचार व नव-संपर्क माध्यमान नव-नव्या विचारांना-लोकांना एकमेकांशी जोडण्याचे काम केले. सोबतच विचार-श्रध्दा-भावना-अभिव्यक्ती ला सोजेल त्या सगळ्या बाबींचे स्वातंत्र मुक्त व मोफत देऊ केले.
परंन्तू त्याचा गैरवापर होने साहजिक होते.

गेल्या बऱ्यांच दिवसांनपासून ( भीमाकोरेगाव प्रकरणानंतर ) बहूदा अॅड / प्रकाश आंबेडकर लोकांना समझू व नेतृत्व म्हणून मान्य असल्याचे जानवू लागले. परंन्तू बऱ्यांच लोकांचा मनात कौतुहल निर्माण झाला तो, कि आजवर न दिसलेले नेतृत्व एेकाएेक कसे काय लोकांना मान्य झाले..?
बहूतेंक लोकांच्या मनात हा प्रश्न आजही आहे आणी तो नित्याचा विषय झालेला मी मानतो. त्यामागे स्पष्टीकरण वा संदर्भ देणे मला मान्य नाही.

दिव्याखाली अंधार असतो अश्याची संख्या आंबेडकरी समाज भरपूर तेव्हा स्पष्टीकरण बांध्य हा खोळसाळ प्रकार.
बाकी आता महाराष्ट्रात नव्या तिसऱ्या वंचित बहूजन आघाडीचा धसका काही सेक्यूलर कम राष्ट्रवाद्यांना पडला याचीच बेरीज-वजाबाकी उघड-उघड दिसते. खास करुन कन्हैया-जिग्नेश-रावण ह्या त्रिकोनी व युवा नेतृत्वाची कुरकुर आज प्रत्येकांच्या मनात चालली असल्याचे उघडपणे दिसत आहे.

मुद्दा अॅड / प्रकाश आंबेडकरांचा आहे ज्यांनी कन्हैया-जिग्नेश-रावण यांच्या समर्थंनात आपली शक्ती लावली मग ती कायदेशिर असो किंव्हा आंदोलन प्रचार व प्रसाराच्या माध्यमाने असो.
ह्यात काही गैर अथवा दुमत राहणार नाही परंन्तू राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी गेल्या काही महिन्यापासून एक नवा सुळसुळात लावला तो म्हणजे आंबेडकरी खास करुन अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वास मान्य असणाऱ्या लोकांच्या मनात ह्या तिनही लोकांच्या बद्दल विष पेरुन एकवटलेला व नव्या संकल्पनेचा युवा वर्ग तोडून आंबेडकरी चळवळ व महाराष्ट्रातील तिसऱ्या  वंचित-बहूजनांनाच्या आघाडीला सत्तेच्या समिकरणात अडकवून परत सत्ता मिळवून आपली मक्तेदारी गाजविण्याचा कट आखून संपुर्ण चळवळीला बदनाम करीत वेठिस धरण्याचा कट ह्या राष्ट्रवादींच्या नेत्याकडून होत आहे. तेव्हा त्यांच्या फसव्या व दोंगल्या राजकारणाला कुणी बळी पडू नये येवढंच.

@RBI_चौक, नागपुर येथे चंद्रशेखर आझाद यांच्या भेंटीनंतर उभ्या झालेल्या प्रश्नाचे संक्षिप्त रुप..!

_रोहित भगत
सम्यक विद्यार्थी आंदोलन / नागपूर

बुधवार, 2 जनवरी 2019

“ मानवमुक्ती चा प्रणेता ”

आजत-गाजत कित्तेक महापुरुष,  थोर नेते, क्रांतीकारी, लढवये होऊन गेले.
इतिहासाने त्यांची साक्ष नोंद केली.
रक्तरंजित क्रांती / रक्तहिन क्रांती / अहिंसक आंदोलन / सत्याग्रह , नानातरेने अनेकांनी दशके गाजवली त्या-त्या समाजाने त्यांना अनेक ठिकाणी जागा दिल्या.
आज कुणी इतिहासाच्या पानात,  कुणी पुतळ्यात, कुणी विदेशात, कुणी उच्चांक लांबीत, कुणी चौकात, कुणी एका पक्षात तर कुणी डोक्यात जागा करुन बंदिस्त झाले. पण सन १८१८ साली शिद्नाक महाराच्या धाडसातून मानाने जगण्याचे व जन्मी पडण्याचे ते अधिकार प्राप्त झाले त्याचीच परत फेड करणारा ह्या पृथ्वी तलावर एक विद्यवान पुढ आला. शतकानु-शतक असह्य यातनेने पिळून गुलामीच्या बेड्यात बंदीस्त असलेल्या समाजाला मुक्त करुन मानवमुक्ती चा जाहीरनामा प्रस्तृत करणारा विख्यात पंडित सुभेदार रामजी मालोजी सपकाळांच्या घरी जन्म घेऊन पुढे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणून जगजाहीर झाला
ह्या जगात खुप नेते होऊन गेले असणार, अनेकांनी क्रांन्ती केली,  बदल घडविले, परिवर्तन केले,  पण कुठल्याही समाजाने त्यांना बाप ह्या शब्दाने नवाजले नाही - महारांनी चक्क बाबासाहेबांना बाप संबोधले आणी आजही आपल्या हदयाच्या ठोक्याप्रमाणे जपतात.
जगाच्या पाठिवर येवढ्या मान कमाविणारा एकमेव मानवमुक्ती चा प्रणेता दुसरा कुणीच नव्हता आणी म्हणूनंच डॉ. भिमराव रामजी आंबेडकर एकमेव महामानव ठरला.

#१४_एप्रिल_१८९१
#१_जानेवारी_१८१८
#भीमाकोरेगाव
#BhimaKoregaon

_रोहित भगत
#सम्यक_विद्यार्थी_आंदोलन_नागपूर