फाशीवादाची मुळ रचना ही द्वि-सुत्री विचारधारा जरी असली तरी जगभरातील धर्मांधवादी त्यांचा आधार घेत त्या-त्या देश्यात आपल्याचं लोकांवर अधिराज्य करण्यासाठी त्यांची अंमलबजावणी करतात. जणू वर्ग व वर्णाच्या संघर्षात धर्मांधांचा हा मुक्त जाहीरनामाचं होय! फाशीवाद ही अराजकिय विचारधारा कधी नव्हतीच! तर ती राजकिय म्हणून एका फॉसिस्ट पक्षाची राजकिय गुरुकिल्ली होती ज्याचा सर्वोसर्वा मुसोलिनी ठरला.
लिबिया वर इटलिच राज्य राहाव व अरबांनी गुलामीचं ओझ डोवारावं म्हणून कटिबंध्य असलेला फासीवादाचा जनक मुसोलिनी नेता ठरला. पुढे हिटलरी वृत्तीने नाझीवाद तयार करुन सामुहिक हत्या घडविल्या. आज भारतांच्या स्वातंत्र लढ्यात माफिनामे सादर करुन आपल्या अलग राष्ट्राची मांग करणारे काही देशभक्त संघ व हिंदूत्व विचारांची बिज नागपूरच्या बळकस चौकाच्या इमारतीतून देशभर पेरण्याचं काम करीत आहे. ति जी अराजकिय संस्था देशभरातील सर्व संस्था काबिज करीत एक राजकिय नेतृत्व पुढे करुन देश्यातील सत्तेच्या माध्यमांन नाझीवादाच्या कार्यपध्दतीने फॉसिस्ट सरकार चे धोरण राबविण्याची प्रयत्न करीत आहे.
आम्ही भारताच्या प्रत्येक घटकातून येणारे लोक जर देश्यातील ह्या द्वि-सुत्री विचारांचा विरोध करणार नाही तर येणारी भावी पिढीचं काय जगभरातील लोक एक विद्रुप अमानविय व धर्मांध लोकांची शिकार झाल्याशिवाय राहणार नाही.!
“ मी माझ्या सध्यास्थित संघर्षातून हा निर्धार करुन पुढे ह्या द्वि-सुत्री विचारांचा विरोध शेवटच्या टोकापर्यन्त करेन येवढंच.!
_रोहित भगत
#सम्यक_विद्यार्थी_आंदोलन_नागपूर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें