दि. २५/०४/१९ महाराष्ट्र टाईम्स च्या “ आंबेडकरी चळवळीने संधी गमावली.? ” ह्या अॅड. जयदेव गायकवाड यांच्या लेखाच्या संदर्भाने.
त्यांच्या मते अॅड. प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचा मागचा अपयंशाचा धडा प्रथम का घ्यावा ह्या बाबीतून होतो.? त्यांच्या लेखातील बार्गेनिग पॉवर च्या निमित्ताने कॉग्रेस-राष्ट्रवादी सारासर व वास्तवादी धोरणातून युतीचे धोरण स्विकारले तर अवघ्या पाच - सहा खासदारवर बार्गेनिग पॉवर निर्माण करणे कसे शक्य झाले असते प्रश्न उभा होतो.?
हेंच नाही तर शेड्युल्ड कास्ट फेडरेशन च्या सहभागात व १९५७ च्या लोकसभा - विधानसभा च्या माध्यमाने संयुक्त महाराष्ट्र आघाडी च्या रुपात १३४ आमदार निवडले गेले. मुख्य म्हणजे एकट्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन ला ६ खासदार व २१ आमदार मिळाले होते. त्याचा आधार घेत १९५७ ला रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली. मग फाटाफुटीचे राजकारण अवघ्या एका वर्षात कॉग्रेस च्या आमिषाने झाले कि संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या रुपाने कॉग्रेस विरोधी पक्षाच्या भुमिकेतून झाले.? रिपब्लिकन फाटाफुटीचा फायदा कुणाला झाला ते मात्र लेखकांनी स्पष्ट मांडलेले नाही. उदा: बी सी कांबळे यांच्या रिपब्लिकन तोडीच्या प्रथम भुमिकेतून तर दादासाहेब गायकवाड यांचा कॉग्रेस समर्थन धोरणातून रिपब्लिकन अस्त कि बॅ. खोब्रागडे यांच्या स्वतंत्र वाटचालीतून झाले.? मग शेड्युल्ड कास्ट फेडरेशन च्या ६ खासदार व २१ आमदारांची मजल संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या रुपातून मारणारा कॉग्रेस च्या दावणीत फक्त एक खासदार व एक - एक आमदार विधानसभा - व - परिषदेच्या जागेवरंच येऊन का थांबला.? तेव्हा मात्र बार्गेनिग पॉवर कुठे गेली होती.? ही सरासर आंबेडकरी मताची अवमानना व विचारांवर केलेला घणाघत वार नव्हता का...?१९८४ च्या काळात अॅड. प्रकाश आंबेडकर रुपाने आंबेडकरी समाजाला एक नेतृत्व मिळाले. भुमिका रिपब्लिकन व आंबेडकरी विचारांना एकत्र करुन कॉग्रेस विरोधी धोरणांचा माणूस उभा राहिला. मात्र कॉग्रेसच्या दावणीत बांधलेले कित्ती लोक त्यांच्या एकसुत्री कलमाखाली आलेत.? या उलट त्यांची भुमिका सु-स्पष्ट असतांना विरोधकाच्या आवाजात आवाज मांडण्याचा कसोसीचा प्रर्यत्न कॉग्रेसन त्यांचे मित्र पक्ष असलेल्या तुकड्याच्या रिपब्लिकन गट करत बसला.!
१९९०-१९९५-१९९६ ह्या तिनदा ऐैक्याचा व १९९८ वगळत तिन ऐैक्य न टिकल्याचा नारळ अॅड. प्रकाश आंबेडकरांवर फोडण्याचा कॉग्रेस प्रेमी व दलित-आंबेडकरी रिपब्लिकन गटाच्या लोकांनी केला. १९९८ च्या युतीन काय साध्य केले का लेखकास प्रश्न.? शरद पवारच्या मध्यस्तीने अवघ्या चार जागा मिळाव्या हा केविलवाणा प्रयोग नव्हता का. प्रामुख्याने कॉग्रेस हींच रिपब्लिकन मताला फोडणारी ठरली. त्यामुळे लेखकाचे हे म्हणने कि ‘ रिपब्लिकन जनता एकसंघ असते तर रिपब्लिकन पक्षाला मोठे यंश येऊ शकते.! मुळात युतीच्या राजकारणात व धमकीवजा ते चार खासदार निवडले गेले असे मी मानतो. त्यात प्रामुख्याने अॅड. प्रकाश आंबेडकर यांची अकोला येथिल सिट सुध्दा गृहीत धरुन. मात्र आंबेडकरी रिपब्लिकन पक्षाचा नेता ठरविण्यासाठी पक्षाची लोकशाही धोरणात्मक बाब नसल्याने एखाद्या दंडेलशाहीने परत पक्षाचे निश्चित रुपातंर गटात होतांना दिसले व झाले सुध्दा. असो आपल्या लेखात हास्यविनोदी रामदास आठवले व काही फुटीरवाद्यांचा उल्लेख नकोसा वाटतो.
लेखकांच्या मताप्रमाणे आठवलेच्या तंत्वशुन्य राजकारणातून समाजाने अॅड. प्रकाश आंबेडकर स्विकारलेला हे कदापी आंबेडकरी समाज मानणार नाही. मुळात कोन हा रामदास..? येथे प्रश्न येतो. सामाजिक चळवळ गहाण ठेवून १९७२ च्या पँथर ला मांजर बनविणारी संकल्पना, सेनेच्या ढसाळ किल्यावर उदोउधो गाणारी पँथरची काळी डरकाळी कशी गृहीत धरावी.?
ज्या अकोला पर्टन वरुन अॅड. प्रकाश आंबेडकरांनी शोषल इंजिनियरिंग उभी केली तसेच अठरापगळ जातीचे राजकारण अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या पाठिशी उभे राहिले. त्यांची सत्यता अकोला जिल्हापरिषद व अनेक ठिकाणच्या नगरपरिषदा सहीय १०० च्या वर नगरसेवकांच्या यादीसह विधानसभेच्या दोन आमदारांची निवळ स्वंयबळावर निवडून आणल्यावरही कुणाला दिसेनासी होईल वाटले नव्हते! ( मुळात २०१४ च्या निवडणुकात लेखकाचे कॉग्रेस प्रेम बहूदा अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या पराभवातून सुध्दा कमी झालेले काही दिसत नाही.) मुळात भारिप-बहूजन महासंघाच्या अस्तित्वाचे राजकारण यंदाच्या २०१९ चा उल्लेख न वगळता सांगू इंच्छितो. त्यामुळे अॅड. प्रकाश आंबेडकरांना भीमाकोरेगाव हल्याच्या निमित्ताने काही अतिविद्यवान व उच्चभ्रु तसेच उच्च-शिक्षित कॉग्रेस प्रेमी प्रशिद्धी च्या झोकात पाहत आहेत. म्हणजे १९९०-९५-९६-१८ च्या राजकारणात अॅड. प्रकाश आंबेडकर कुठेही नसल्याचे पडदे टाकण्याचे व संघर्षाच्या बाबीला मुठमाती देऊन इतिहास नष्ट करतांना लेखक दिसतो. त्यामुळे नव्या इनिंगची सुरुवात व कॉग्रेस प्रेमी ( ज्यांची पोट भरली आहेत असे व ज्यांना भाजपाच्या दहशताची भिती निर्माण झालेे असे ) कळकळून कॉग्रेस सोबत वंचित बहूजन आघाडी ने जाव ही रिंघ लावली. त्यामुळे एकंदरीत १२ सिट व त्याही खाली ८ सिटापर्यन्त ठाम राहून बैठकिच्या माध्यमाने भाजपा जातीवादी व धर्मार्थ पक्षाला व लोकशाही-संविधान बचावण्यासाठीचा पर्यत्नात पुढे राहण्याची तयारी दर्शवतांना सुद्धा कॉग्रेस व त्यातिल सामिल दलित नेत्यांना परत एकदा आपल्या अस्तित्वाची जाणिव झाल्याने त्यांनीच ही युती होऊ दिली नाही. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. कॉग्रेस स्वंताह दोन भागात वाटलेली आहे व भाजपा च्या मुठित आवळली गेली आहे. हेंही कॉग्रेस प्रेमी यांना बहूतांश मान्य होणार नाही.
तेव्हा बिनबुळाचे सल्ले व महाराष्ट्राच्या ४८ सिटांवर वंचित बहूजन आघाडी लढल्याने आंबेडकरी चळवळीने संधी गमावली.? हा प्रश्न उभा करणे बालिशपणाचे म्हणावे लागेल.
आंबेडकरी समाजाने अखंड भारताचे राजकारण आपल्या खांद्यावर घेऊन फक्त एकट्यानी कुर्बानी द्यावी ही अट शिथिल करावी वाटते. ह्या अखंड भारताचे राजकारण माळी / कोळी / मांग / मांतग / धनगर / भटके / आदिवासीच्या ही खांद्यावर देऊन सत्तेपासून ज्यांना दुर ठेवले अश्या वंचित-बहूजनाचे स्वतंत्र राजकारण आंबेडकरी विचारांच्या प्लेटफॉर्मवरुन सुरु व्हायला पाहिजे. तेव्हा निश्चित येणाऱ्या काळात नवा रिपब्लिकन पक्ष व त्यांचे नेतृत्व बिन आंबेडकरी व डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातील विचारांने उभा होईल.
___हैदोस घातलेल्या भाजपाला बाजूला सारण्यासाठी ६१ वर्षाच्या कॉग्रेसी राजकारणाला बळी पडलेल्या रिपब्लिकन ने फक्त अवघ्या पाच वर्षासाठी भाजपा हटवून पुढच्या पाच वर्षासाठी कॉग्रेसच्या दावणीला स्वंताह बांधून घेऊन ६६ वर्ष राजकारणातून अल्पित राहव का..? ह्या प्रश्नासहीत आंबेडकरी विचार व झेंन्डा भाड्याने देणे नाही!
___तेव्हा वंचित बहूजन आघाडी आपल्या २०१९ च्या ह्या निर्णायक भुमिकेतून पुढे येईल व १९५७ च्या संयुक्त महाराष्ट्र आघाडीच्या रुपान आपली बार्गेनिग पॉवर वाढविण्यासाठी सुसज्ज होईल..! येवढंच.....
रोहित भगत
सम्यक विद्यार्थी आंदोलन
अप्रतिम दादा .
जवाब देंहटाएंabhyaspurn vivechan
जवाब देंहटाएंApratim
जवाब देंहटाएं