सर्वत्र हरलो! पण आयुष्य गमावले नाही, टाहोळे फोडणार नाही. प्रस्तापितांनी एकजुट करुन राजकारणात डाव साधला, हो प्रस्तापित सदैव जिंकतंच असतात.! आणी लढणारे सदैव पराजित होत असतात. ‘ आम्ही ही चुकतो ही चुक मान्य करुन पराभव स्विकारुन तरुणांच्या भावना राखायला हव्या.! “ ही लोकशाही आमची नाही हे मी मान्य केल त्याचे कारण भीमाकोरेगाव हल्याप्रकरणात दि. ६ जुन २०१८ ला अॅड_सुरेंन्द्र_गडलिंग याची बेकायदा अटक व तेव्हा पासून ते आजवर अकारण त्यांना बंदिस्त करुन एका तरुण चळवळीला खिंड पाडीत फक्त राजकारणाचा व निवडणूकांचा खोटा डाव साधत लोकशाही वाचवा यांचा ओरड म्हणून ” मुळात लोकशाही आहे तरी कुठे.? ह्या उभ्या सिमेंन्टच्या जंगलातील रानटी विचारांच्या हाड - मास असलेल्या माणसाच्या जगात.? माझ्या बोटावरची शाई ही लोकशाही टिकविणार नाही मला माहित आहे. लोकतंत्र_बचाव संविधान_बचाव हा माझाही प्रर्यत्न असतो पण तोंही त्यांनी हानून पाडला. आता खेरीज पर्याय काय....लोकशाहीवादी / आंबेडकरवादी / उच्चकोटीची विद्यवंत्तावादी / राजकर्ते / निवडणूकवादी / तुम्ही सांगा ह्या पाच हजार वर्षाच्या युध्दाचा शेवट कसा करायचा..?
हा प्रश्न तुमच्यावर सोडला.
तरुणांचे आयुष्य दावणीला बांधलेल्या बैलासारखे नाही येवढंच सागून.!
...माझ्या बोटावरची शाई, ही लोकशाही टिकविणार नाही..
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें