बुधवार, 13 नवंबर 2019

युद्ध भुमीतूनंच

युद्ध भुमीतूनंच जन्म घेतला आम्ही, दंगल - हल्ले - हत्या जवळून पाहिल्यात आम्ही, दगा-फटका नवा नाहीचं ना, सर्वाच्या विरोधात एल्गार पुकारला आम्ही, वर्ष बोटावरती मोजण्यासारखे नाहीत तेवढे शरीरांचे तुकडे पाहिलेत आम्ही, सोनई खर्डा, खैरलांजी, जवखेडा , रमाई नगर ही पाहिला आम्ही, सेनेच्या सरकारची गोळी तर भाजपच्या हातून रोहित ची कत्तल पाहिली आम्ही, शासनाची व्याख्या -सत्तेची परिभाषा दारातंच असते आमच्या संयमाची डोर तेवढी हातात ठेवली आम्ही,चळवळीचा झेंडा हातात धरुनी आंदोलनातून न्यायाची अपेक्षा असते कारण ह्या मातीला जपतो म्हणून युध्दभुमीला ही बुद्धाची भुमी समजतो आम्ही.!

#भीमाकोरेगाव
#घोषित_आणीबाणी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें