गुरुवार, 28 नवंबर 2019

महाराष्ट्रात चक्रव्युहाचे जाळे.!

महाराष्ट्रात चक्रव्युहाचे जाळे.! 
२०१४ च्या भाजप विजया नंतर महाराष्ट्रात अल्पमताच्या समाजाचा मुख्यमंत्री होणार ह्या उत्साहाने नागपूरातले राष्ट्रीय स्वंयमसेवक संघ फुलले व घोषणा व शपथविधि होतांच हेडगेवार स्मारक समितीच्या पटांगणात सर्वत्र ढोल-ताशा आवाजसहीत लेझिम चा झनझनाट झाला. पुढे केंन्द्र व राज्य सत्ता हाती येतांच हिंदू राष्ट्र संकल्पना अधिक बळकावली गेली त्याला भर उत्तर प्रदेश राज्याच्या भाजपाच्या विजयाने व राम मंदीर मुद्दयावर बहूमत गोळा करीत न्यायालयाची लढाई तेज करण्याचे ही काम जोमात लागले. महाराष्ट्राला मात्र ब्राम्हण समाजाचे नेतृत्व लाभलेला संघ हळू-हळू आपले पाय देशभर रोवण्यासाठी पसरु लागला व आपल्या अल्प संख्याक असलेल्या शाखांना देशभरासहीत राष्ट्रीय पातळीवरच्या विश्व-विद्यालयात सुद्धा पसरवून देश्यात शिक्षण व्यवस्थेच्या रुपाला बदलवू पाहण्याचे स्वप्न सत्यात उतरवू लागला. हे सगळ करीत असतांना अनेक नकळत बाबी त्यांच्या हातून घळून गेल्यात परंन्तू ज्याच्या जोरावर संघ हिंदू राष्ट्र संकल्पना राबवित सुटला त्यांचे नियंत्रण अनियंत्रित होत गुजरात राज्याच्या व्यापारी वर्गाच्या हातात जाऊन बसला ( इटलीच्या मुसलोनी द्वारा प्रस्तापित फॉसिस्ट सरकार च्या धोरणा नुसार राष्ट्रवादाच्या आधारे संपुर्ण सत्ता केंन्द्र सत्ताधाऱ्यांच्या हातात राहणे गरजेचे ठरले होते ) परंन्तू भाजपा च्या बळावर ते होतांना संघाला काळानुसार दिसेना झाले, आणी नियंत्रण सुटले संघानी केंन्द्राच्या सत्तेशी आपले नाते हळू - हळू काढण्याचा पर्यन्त सुरु केले. त्यात भर घालणारे केंन्द्रीय परिवहन व रस्ता बांधकाम मंत्री नितिन गडकरी यांनी दिला. ( भाजप पक्षाला राष्ट्रीय पातळीवर भाजप चा अध्यक्ष म्हणून नितिन गडकरी जास्त दिवस योग्य वाटला नव्हता नंतर सुत्र अमित शाह यांच्या हातात दिल्या गेले ) गेली पाच वर्षातून सरत्या क्षणाला अनियंत्रित सत्ताधारी हे फक्त दोनंच लोकांच्या भरविश्यावर उभी आहे अशा भास गुजरात च्या ह्या व्यापारी नेत्यांना वाटला. तोल गेलांच आणी तिन राज्याची सत्ता भाजपाच्या हातून निसटली ( EVM वरिलचा अविश्वास लोकांच्या मनातून निघावा हाही प्रार्थमिक बाबीला गृहीत धरुया ) पुढे देशभरात भाजप व संघाच्या विरोधी विद्यार्थी वर्गाचा उद्रेक हा सत्ताधारी वर्गाच्या हट्टापाई वाढत गेला. तो आजत - गाजत आजपर्यन्त चालूचं आहे. 
मुद्दा महाराष्ट्राचा पाहिला तर ह्या राज्यात २०१८ रोजी भीमाकोरेगाव प्रकरणातून भाजप व संघ विरोधी महार - मराठा - बहूजन - OBC समाजाचे सुर एकमताने उमटू लागले, हा हादरा संघासाठी जबर होतांच पण सोबत हिंदू राष्ट्र संकल्पनेला खिंडही पाडणारा होता. आणी म्हणूनंच अचानक पणे राम मंदीराचा मुद्दा अंतिम टप्यात आणून हिंदूच्या भावना व दुरावलेला मराठा / बहूजन / आणी OBC एकवटण्याचा मसूदा ठेवला गेला. पंरन्तू एकिकडे ह्या मसुद्यावर हितरक्षा करतांना सोबत अल्पसंख्याक मताच्या मुख्यमंत्र्याच्या मनात गुजराती व्यापारी वर्गाच्या सत्ताधाऱ्यांबद्दल चे वाढते प्रेम ही खुपायला लागले आणी महाराष्ट्राच्या मुसद्दी राजकारणातल्या माणसाला अर्थांत शरद पवाराला नितिन गडकरी व्हाया संघाने जवळ करण्याचा छुपा सफल प्रयोग केला. हा सफल प्रयोग ठरला ही कारण गुजरात च्या व्यापारी नेत्यांनी जेव्हा शरद पवाराची कबंर तोडण्यासाठी प्रवर्तक विभागाचे द्वारा त्याची चौकशी बसवून तुरुंगाच्या द्वारापर्यन्त त्याला ओढण्याचा प्रर्यत्न केला ( पी. चिदंबरम यांच्या वरिल कार्यवाही ची तातळी का ? तर राज्यसभेच्या पी. चिदंबरम च्या भीमाकोरेगाव वरिल आरोप लावलेल्या लोकांच्या बद्दल दिलेल्या स्पष्ट मताच्या रुपान दिसेल ) तेव्हा संघाच्या छुप्या व स्वंताच्या अल्पसंख्याक मुख्यमंत्र्यासहीत केंन्द्राच्या ह्या व्यापारी तसेच संघाच्या नियंत्रणातून हद्दपार झालेल्या सरकार व त्यावर विराजमान झालेल्या ह्या व्यापारी वर्गाच्या दोन शेठ नेत्यांना कायमचे संपविण्यासहीत कॉग्रेस मुक्त तसेच हिंदूत्वाचा निवड चेहरा राहिलेल्या प्रांतिय पक्षाला संपविण्याचा कुटील डाव खेळली गेला. त्या डावाचे डावपेंच संघाच्या आखणीतून पवाराच्या फासातून पुढे येत आहे. जे ह्या देशभराने पाहिले ते आजवर कधीच घडले नाही, युतीच राजकारण व आघाडीच राजकारण सांगत सत्तेसाठी जनतेपुढ जाणारे अचानक सत्ताप्राप्ती साठी कुठल्याही अटी व वायदे केल्यागेल्याचे मान्य करण्यास तयार नव्हते, व ह्याच संधीच सोन करण्यास संघ सरसावला शरद पवाराच्या मुसद्दी राजकारणाऱ्या माणसाला हाताशी पकडून कॉग्रेस चा सेक्युलर चेहरा व शिवसेनाचा हिंदूत्व चेहरा महाविकास आघाडीच्या रुपाने ओरबळून काढला. ( लोकांच्या मानात फक्त स्वं-सत्ताप्राप्ती साठी कुठलेही स्तर गाठण्यास आता कट्टर पक्ष व सेक्युलर चेहरे आप- आपली मुखवटे उतरवून एकाच बाकावर बसण्यास तयार झाले असे चित्र प्रदर्शित करण्यात आले ) आज संघाला पाहिजे ते मिळविता आले. तिकडे गुजरात च्या त्या दोन शेठ व्यापारी नेत्याच्या सोबत मनमिळवणी करणारा सत्तेतून तसेच राज्याच्या राजकारणातून आता हळू - हळू लोप पावणार तर कॉग्रेस व शिवसेनाच्या ह्या महाविकास आघाडीच्या रुपान दोंन्ही पक्षाच्या मताना खिंड पाडून ह्यांनाही लोकांच्या मनातून पायउतार करीत फक्त संघ प्रणित भाजपाचे वर्चव्हं राहावे अशी युती लढवित आज दि. २८/११/१९ रोजी लोकांना अपेक्षित नसलेली तिहेरी युतीची सरकार प्रस्तापित केली. लोकांच्या मानातील उद्रेंक व राजकारणासहीत भारतीय निवडणूक प्रक्रिया व त्यावरील विश्वासाची पातळी खालच्या स्तरावर जाईल असेचं चित्र उभे केले.
ह्या चित्रातून हंगामात शरद पवार हा देश्याचा प्रधानमंत्री अथवा राष्ट्रपती म्हणून पाहला जाईल पण महाराष्ट्रातून शिवसेना व केंन्द्रातून कॉग्रेस ची गळती मात्र निश्चित होत, गुजरात च्या व्यापारी शेठ नेत्याच्या सुध्दा नायनाट करुन सनातनी व आर्यशुद्ध रक्तांचा विजय रचला जाईल.! 

ह्या अंत्योदय राजकारणात व सत्ताप्राप्ती लोकांच्या चक्रव्युहात महाराष्ट्राची व देश्याची जनता मात्र गुरफळली येवढंच खर...!

रोहित भगत
नागपूर 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें