गुरुवार, 31 अक्टूबर 2024

ढोंगी लोकांची ढोंग उतरली असतील तर...!

दि:- 16/10/2016
नागपुर :-
..........ढोंगी लोकांची ढोंग उतरलीत असतील तर अत्याचाराचे बळी पडलेल्यांना विचारा मारलेल्या घावाची संख्या व वाहलेल्या रक्ताची लोट कित्ती होती..?
=================================
निचतेचा कहर जातीयवाद्यांनी माडंला व समाजातल्या सुन्न-निर्ढावलेल्या, कपटी मानसिकतेने त्यांच्या वेदनेचा राजकिय फायदा घेण्यासाठी रस्ता गाठला.

       " अरे कूठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र "

बोंबा हाकणारे UP - बिहारी लोकांना धंद्याच्या व धर्माच्या नावाने मुसलमानांना मारणार तसेच मराठी पावलाची मजल सागणारे काय ह्या महाराष्ट्राच्या भुमितला आंबेडकरी समाजाचा माणूस आत्ता मराठी नाही..?

काय शिवरायाचा मानक नाही....? 
कि तुमच्या राज्याचा मतदाता नाही....?

रक्ताची होळी करु पाहणाऱ्या निर्दयी मानसिकतेने निदान शिवरायाचा इतिहास वाचावा.
नि छाती ठोकून विचारांव विधान भवनात पाठवलेल्या आपल्या त्या नेत्यांना का आमच्या हक्कासाठी आम्हीच रस्ता गाठावा.

आज आंबेडकरी समाजाकडे ना नेतृत्व आहे ना नेता ना सत्ता ना पैसा जी सुधारली ति बेईमानाच्या फौज मधे सामिल झाली.

तरी संघर्षाला आपल्या पाठिशी घेऊन जिवन जगविण्यासाठी नव्या उमेदीने वाट पाहत आहे.
कोन करतो अत्याचार | कित्ती काळ लोटला ह्याच महाराष्ट्राच्या भुमित जातियवाद्यांनी निचतेचा कळस गाठला. तेव्हा कूठेही आंबेडकरी समाज चवताळला नाही कि रस्त्यावर येऊन अंघाराचा फायदा घेत कूणाचा घर पेटवित सुटला नाही. अन्यायाला न्याय-पालिकेच्या साह्यायाने न्याय मिळण्याच्या आशेने पाहत राहीला. पण पदरी निराशांच पडली. ह्या देश्याची ह्या राज्याची सत्ता ही एकमताने तुमच्या अधिपत्ताखाली असूनही तुम्ही स्वंताला अन्यायग्रस्त मानता निश्चितच हा मोठा केविलवाना प्रश्न ठरेल.

" अहो आमच्या रक्ताची रांगोळी ही तुमच्या सणाला तुमच्या दाराची शोभा जरी वाढवेल पण मित्रांनो त्या घराच्या दारात तो आनंद वावरतांना तुम्हास दिसणार नाही "
=================================

_ अन्याय-अत्याचार विरोधी कृती समिती_ नागपुर _

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें