गुरुवार, 16 अप्रैल 2026

शेवटच्या क्षणातला वीरा कसा होता...?

शेवटच्या क्षणातला वीरा कसा होता...?
पांढऱ्या शुभ्र केसातून
नव तारुण्य दाखविणारा..
आम्हाला तरुणानां लाजवीणारा...
धडपणारा, धावणारा, वेळेच्या आता स्वतःला बांधणारा...
लिहणारा, बोलणारा, वाचणारा, आणि उरलाच तर एखाद्या सभेतून भाष्य करणारा...
पण कधी न थकणारा...
प्रत्येकांना जोपासणारा, जेवलास का विचारणारा, उरलचं तर रांधून जेवू घालणारा...
माहित आहे शेवटचा क्षणातला वीरा कसा होता..?
तापाने ग्रासलेला, बिस्तऱ्यात चित पडलेला, आर्यूवेदाचा काळा पीत 
“ मेरे को कुछ नही हुआ हें ” 
असा बोलणारा...
स्वतःचा दवाखाना निवडणारा 
“ जुगाड हो गया हैं, तू किधर हें म्हूणन लवकर ये बरून उभा आहे ” 
म्हणणारा...
निहाल ने पाठवलेल्या पैस्याला स्वतः ATM मधून काढून 5000 हजार ठेवीत 
10000 माझ्या हातात देणारा...
दवाखान्यात पोहचताच चिट्ठी निकाल म्हणणारा...
स्वतःचा स्टेचर स्वतःच शोधत... 
त्यावर निवांत पडणारा..
अंगातला पांढरा शुभ्र शर्ट आणि त्यावरचा निळा जीन्स...
गळ्याभोवती लाल रंगाचा गमचा...
आणि शेवटचा चालत जाणारा वीरा...
वीरा आम्हाला कळलाचं नाही...?
13 च्या सकाळी फक्त बातमी...
“ वीरा गेला...
कायम स्वरूपी... ” 
कायम चा न परत येणारा...📌

#VeeraSathidar #AmbedkarJayanti #jaybhim

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें