मंगलवार, 14 नवंबर 2017

होय मी लाभार्थी!

होय_मी_लाभार्थी!
नागपुरच्या वाढत्या प्रदूषणाचा
धुडीचा/मातीचा/खडकाड रस्त्याचा/
कायदेशीर रित्या होणाऱ्या लुटीचा/तुमच्या कॅमेरासद्रूष वस्तूच्या डोळ्यात कैद असल्याचा/ तुमच्या नाहक जांचाचा बळी.

होय_मी_लाभार्थी!
तुुमच्या आर्थिक प्रगतीच्या वाटेतला शोषक म्हणून/तुमच्या खोट्या विकासाच्या/तुमच्या अदानी-अंबानी तुमच्या नोटबंदीचा/तुमच्या तर्फे घेतलेल्या कर्जाचा.

होय_मी_लाभार्थी!
तुमच्या पंथनिरपेक्ष विचाराचा/धर्मा आड-जाती आड केलेल्या कत्तलीचा/जाड-पोळी/कापनीचा/जिवंन्त पेटवून मरण येण्याचा.

होय_मी_लाभार्थी!
माणूस मनाच्या हरपून बसलेल्या भावनेचा/ खैरंलाजी/सोनई/खर्डा/कवलेवाडा आणी जवखेड्याचा
मालेगाव/बदायू/मुज्जफरनगर/शहारपुराच्या दंगलीचा

होय_मी_लाभार्थी!
किटकनाशकात स्विकारलेल्या मरणाचा/शेतपिका पाई घेतलेल्या कर्ज फेडीचा/वेदनेपोटी टाकलेल्या उडीचा/आधार लिंक नसलेल्या भुकेचा/तुमच्या जगंली सत्तेचा-जुलमी व्यवस्थेचा.

होय_मी_लाभार्थी!
पहलू च्या हत्येचा/जुनेद-नजिब-अखलाख ला गमावल्याचा/रोहित च्या आत्महत्येचा/तुमच्या नंग्न करुन काढलेल्या धिंडेचा/तुमच्या लाकडी फडी व चाबकाच्या मारेचा/कुपोषणाचा/अविकसित राज्याचा तर पडला बळी विकसित धर्मराज्य व्यवस्थेचा.

होय_मी_लाभार्थी!
महाराष्ट/छत्तिसगढ/ओरिसा/झारखंड मधल्या खनिज संपदेच्या लुट माजवित केलेल्या प्रत्येक हत्येचा/आय-बहिनीवरच्या बलात्कार करुन फेकलेल्या मृत शरीराला घेऊन न्याय मागणाऱ्या न्यायालयाचा चढलेल्या पायऱ्यांचा.

होय_मी_लाभार्थी!
तुमच्या धर्म परंपरेचा/तुमच्या ‘ सबका साथ-सबका विकास ’ पासून दुर असल्याचा.

होय_हे_माझ_सरकार!
होय माझ्या खऱ्या दुखाच सरकार!
लोकशाही संपवून पेशवाई आणू पाहणार संघाचे भाजप_सरकार

                              
                                                 __रोहित__

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें