बुधवार, 2 जनवरी 2019

“ मानवमुक्ती चा प्रणेता ”

आजत-गाजत कित्तेक महापुरुष,  थोर नेते, क्रांतीकारी, लढवये होऊन गेले.
इतिहासाने त्यांची साक्ष नोंद केली.
रक्तरंजित क्रांती / रक्तहिन क्रांती / अहिंसक आंदोलन / सत्याग्रह , नानातरेने अनेकांनी दशके गाजवली त्या-त्या समाजाने त्यांना अनेक ठिकाणी जागा दिल्या.
आज कुणी इतिहासाच्या पानात,  कुणी पुतळ्यात, कुणी विदेशात, कुणी उच्चांक लांबीत, कुणी चौकात, कुणी एका पक्षात तर कुणी डोक्यात जागा करुन बंदिस्त झाले. पण सन १८१८ साली शिद्नाक महाराच्या धाडसातून मानाने जगण्याचे व जन्मी पडण्याचे ते अधिकार प्राप्त झाले त्याचीच परत फेड करणारा ह्या पृथ्वी तलावर एक विद्यवान पुढ आला. शतकानु-शतक असह्य यातनेने पिळून गुलामीच्या बेड्यात बंदीस्त असलेल्या समाजाला मुक्त करुन मानवमुक्ती चा जाहीरनामा प्रस्तृत करणारा विख्यात पंडित सुभेदार रामजी मालोजी सपकाळांच्या घरी जन्म घेऊन पुढे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणून जगजाहीर झाला
ह्या जगात खुप नेते होऊन गेले असणार, अनेकांनी क्रांन्ती केली,  बदल घडविले, परिवर्तन केले,  पण कुठल्याही समाजाने त्यांना बाप ह्या शब्दाने नवाजले नाही - महारांनी चक्क बाबासाहेबांना बाप संबोधले आणी आजही आपल्या हदयाच्या ठोक्याप्रमाणे जपतात.
जगाच्या पाठिवर येवढ्या मान कमाविणारा एकमेव मानवमुक्ती चा प्रणेता दुसरा कुणीच नव्हता आणी म्हणूनंच डॉ. भिमराव रामजी आंबेडकर एकमेव महामानव ठरला.

#१४_एप्रिल_१८९१
#१_जानेवारी_१८१८
#भीमाकोरेगाव
#BhimaKoregaon

_रोहित भगत
#सम्यक_विद्यार्थी_आंदोलन_नागपूर

1 टिप्पणी: